Ad will apear here
Next
डॉ. बुरुंगले यांना कविवर्य नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार


औंध : रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आणि हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची दाखल घेऊन येथील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे त्यांना पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचे भारतीय साहित्यात मोठे योगदान आहे. त्यांचा जीवनप्रवास अनेक साहित्यिक, कवी, लेखकांना व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणून साहित्य, कामगार व शिक्षण क्षेत्रातील प्रतिभावंतांना दर वर्षी महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे सन्मानित केले जाते.  

डॉ. बुरुंगले यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या विकासाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून त्यांनी अनेक सुधारणा केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षणासाठी त्यांनी मेहनत घेतली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना, तसेच विद्यार्थिनींचे अद्यावत वसतिगृह आणि त्यांच्या सांस्कृतिक जडण-घडणीसाठी डॉ. बुरुंगले यांनी विशेष मेहनत घेतली. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन महाविद्यालयाचे काम सर्वसामान्य व बहुजन समाजतील मुलांच्या कल्याणासाठी करत आहेत. डॉ. बुरुंगले यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्काराचे वितरण भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या समारंभासाठी डॉ. यशवंत मनोहर, डॉ. गिरीश गांधी, रामदास फुटाणे, बाळासाहेब थोरात आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ पुणे येथील भांडारकर सभागृहात संपन्न झाला. त्यांना मिळालेल्या पूरस्काराबद्द्ल औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्रा. डॉ. अतुल चौरे, व प्रा. नंदकुमार उदार यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZQHBU
Similar Posts
‘रयत शिक्षण संस्थेमुळे जीवनाचे सोने झाले’ औंध : ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले. मी ही त्यातील एक विद्यार्थी असून, माझ्यासारखे हजारो विद्यार्थी झोपडपट्टी परिसरातून शिक्षणासाठी येत होते; मात्र त्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. अशा वेळेस डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे उपस्थित होते.
पुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट औंध : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या नवनियुक्त अभ्यास मंडळ सदस्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला आठ ऑगस्ट रोजी भेट दिली.
परदेशी साहित्यिकांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट औंध : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामध्ये जागतिक भाषांचे प्रतिनिधित्व करणारे भाषाबन साकारणार आहे. त्यानिमित्त पेन इंटरनॅशनल काँग्रेस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यविषयक परिषदेत सहभागी झालेल्या १८० देशांमधून आलेल्या साहित्यिकांपैकी सात भाषेत लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी औंध येथील डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language